Description
कवितासंग्रह – ‘कारुण्यबोध’ आपल्या भेटीला…
१) वैश्विक महामारी कोरोना काळातील भयावह परिस्थितीचा साहित्यिक दस्तऐवज ठरावा असा कवितासंग्रह…
२) या संग्रहात नांदी, वृत्तबद्ध कविता (पादाकूलक वृत्त, अक्रूर वृत्त), मुक्तछंद, अभंग (मोठा व लहान), अष्टाक्षरी, षडाक्षरी, समाक्षरी, गीत (जुन्या लोकप्रिय गीताच्या चालीवर लिहलेल्या गीतासह) तसेच गझल अशा विविध प्रकारच्या रचनांचा समावेश
असून
प्रत्येक रचनेच्या शीर्षकाखाली रचनेच प्रकार, वृत्त, मात्रा व लगावली नमूद केलेले आहेत.
३) नवीन किंवा प्रथमच कवितासंग्रह, कथासंग्रह वगैरे प्रकाशित करू इच्छिणाऱ्या कवी/ लेखकांसाठी मार्गदर्शक अशी कवितांची तसेच पुस्तकाची मांडणी केली असल्याने हा संग्रह आवर्जून संग्रही ठेवावा असा आहे.
४) कोरोना काळ अनुभवलेल्या प्रत्येकाच्याच तसेच या महामारीमुळे हकनाक बळी ठरलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा संग्रह आपल्या संग्रही असायलाच हवा.
तसेच
आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतिदिनानिमित्त किंवा स्मृतिप्रीत्यर्थ या संग्रहाच्या प्रती आपले आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्रमंडळी यांना वाटप करू शकतात.
५) ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. अेकनाथ पगार सरांची ‘कोरोना काळाचा कारुण्यबोध’ अशी समर्पक प्रस्तावना/ पाठराखण या संग्रहाला लाभली आहे.
६) जेष्ठ साहित्यिक अर्जुन वेलजाळी सर, कवी, व्याख्याते, प्राचार्य राजेश्वर शेळके सर, ज्येष्ठ साहित्यिक सोमनाथ साखरे सर, ज्येष्ठ साहित्यिक सुनिल गायकवाड सर या मान्यवरांचा मुद्रित शोधनासाठी मोलाचा हातभार, ही या संग्रहाची जमेची बाजू.
७) प्रसिद्ध चित्रकार संजय पाडवी सरांचे उत्कृष्ट व विषयाला अनुरूप असे अप्रतिम मुखपृष्ठ.
८) २५ वर्षाची परंपरा असलेल्या नामांकित पायगुण प्रकाशनाची दर्जेदार निर्मिती.
९) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन यापूर्वी मी लिहलेल्या माझ्या इतर कवितांचा माझा ‘वेदनेचे काटे’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला असल्याने त्यानंतर लिहलेल्या व आता प्रकाशित होत असलेल्या ‘कारुण्यबोध’ या कवितासंग्रहात चांगल्या आशयपूर्ण तसेच वाचनीय कविता आहेत, याची हमी.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त साहित्यिक. गीतकार/ कवी, लेखक, समीक्षक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर








Reviews
There are no reviews yet.